Crime NewsLatest NewsMaharashtra

सांगलीत थरकाप उडवणारी घटना : चोरीच्या संशयातून बापाने मुलींना उलटं टांगलं, १० वर्षांच्या सानिकेचा मृत्यू

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील बनपुरी गावात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चोरीच्या संशयातून एका निर्दयी बापाने आपल्या दोन अल्पवयीन मुलींना रात्रभर उलटं टांगून अमानुष छळ केल्याने १० वर्षीय सानिका हिचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तिची ११ वर्षांची बहीण अनुजा हिची प्रकृती गंभीर असून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शेजाऱ्यांनी चोरीचा संशय घेतल्यामुळे संतापाच्या भरात नाना हैबत यमगर या बापाने बुधवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता दोन्ही मुलींचे हात-पाय बांधून घरातील पत्र्याच्या अँगलला उलटं टांगलं. रात्रभर त्या निष्पाप मुली वेदनेने तडफडत “पाणी, पाणी” अशी आर्त हाक मारत होत्या. मात्र, आई-वडिलांनी त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले.

या अमानुष छळामुळे सानिकाचा रात्रीच मृत्यू झाला, तर अनुजा बेशुद्ध अवस्थेत होती. गुरुवारी सकाळी आजोबांनी दोघींना खाली सोडल्यानंतर ही भयंकर घटना उघडकीस आली. अनुजाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर सानिकेला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

या घटनेनंतर प्रकरण दडपण्याचा प्रयत्नही झाल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांनी सानिकेचा अंत्यसंस्कार गुपचूप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रुग्णालयात शुद्धीवर आल्यानंतर अनुजाने डॉक्टरांना दिलेल्या जबाबातून संपूर्ण प्रकार उघड झाला.

या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button