citynewsLatest NewsMaharashtraSangli

पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी ४.३४ कोटींचा निधी; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची घोषणा

सांगली :
पोलीस दलाच्या बळकटीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत ४ कोटी ३४ लाख १६ हजार १९३ रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून भविष्यातही भरीव निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

सांगली जिल्हा पोलीस दलाच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत पोलीस दलाच्या सात महत्त्वाच्या कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला आमदार डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, पोलीस अधीक्षक संदीप घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी अशोक पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर तसेच पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

पोलीस दल अधिक सक्षम आणि सुसज्ज करण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असून, नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक त्या सुविधा आणि पायाभूत कामांना प्राधान्य दिले जाईल, असेही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button