citynewsIndia NewsLatest News

दिल्लीत भीषण आग; घरातील आगीत 5 जण गंभीर जखमी

नवी दिल्ली :
उत्तरी दिल्लीतील त्रिनगर परिसरात शुक्रवारी सकाळी एका घराच्या तिसऱ्या मजल्यावर भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत पाच जण गंभीर जखमी झाले असून परिसरात काही काळ अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून त्याचा तपास सुरू आहे. आग लागल्यानंतर घरातील नागरिकांमध्ये एकच गोंधळ उडाला. मात्र, अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्पर कारवाईमुळे परिस्थिती लवकर नियंत्रणात आणण्यात यश आले.

घायाळ झालेल्या पाचही जणांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सर्व जखमींची प्रकृती गंभीर असली तरी सध्या स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी अग्निशमन दलाला आगीची माहिती मिळताच तीन अग्निशमन बंब, केशवपूरम पोलीस ठाण्याची टीम आणि एक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल करण्यात आली होती. तातडीने बचावकार्य राबवत आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button