citynewsFestival NewsLatest NewsLocal NewsMaharashtraNagpurNagpur gramin

रामटेकमध्ये रामभक्तांचा उत्साह शिगेला; राम जन्मोत्सवासाठी गडमंदिर सज्ज, प्रशासन अलर्ट

रामटेक येथे राम जन्मोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रामभक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. रामटेक गडमंदिर येथे लाखो भाविकांच्या आगमनाची अपेक्षा असून, मंदिर परिसरात व्यापक तयारी करण्यात आली आहे.

“दुसरी अयोध्या” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पवित्र स्थळी दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने भाविक दाखल होणार आहेत. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे प्रभू श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांची स्वतंत्र मंदिरे आहेत.

रामनवमी निमित्त महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड येथून भाविक मोठ्या संख्येने येथे येणार आहेत.

भाविकांच्या सोयीसाठी हिरवी शेड नेट, महाप्रसाद आणि थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय पथके आणि स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. प्रशासनही अलर्ट मोडवर असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे.

संपूर्ण रामटेक परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, रामभक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहताना दिसत आहे.

रामटेकमधील हा राम जन्मोत्सव भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम ठरणार असून, लाखो भाविकांच्या उपस्थितीत सोहळा भव्यदिव्य पार पडणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button