DharmikLatest NewsWashim

भव्य कलश यात्रेने शिवमहापुराण कथेचा शंखनाद; हजारो भाविकांची उपस्थिती

मालेगाव: वाशिम जिल्ह्यातील मालेगाव शहरात आजपासून भक्तीचा महाकुंभ भरला आहे. श्री संत गजानन महाराज प्रगट दिन सोहळ्यानिमित्त आयोजित **’भव्य श्री शिवमहापुराण कथा व कीर्तन महोत्सवा’**ला आज, रविवार १ फेब्रुवारी रोजी अत्यंत उत्साहात सुरुवात झाली. या निमित्ताने काढण्यात आलेल्या भव्य कलश यात्रेने संपूर्ण मालेगाव शहर शिवमय झाले होते.

कलश यात्रेने वेधले सर्वांचे लक्ष

आज सकाळी ९ वाजता दुर्गा चौकातून या मंगल कलश यात्रेचा प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा गजरात आणि बँड-डीजेच्या निनादात निघालेल्या या यात्रेत हजारो महिलांनी डोक्यावर मंगल कलश धारण केले होते. यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे आकर्षक रथावर विराजमान असलेले परमपूज्य महामंडलेश्वर श्री श्री १००८ श्री उत्तम स्वामी महाराज होते.

मार्गावर भक्तांचा जनसागर

ही कलश यात्रा दुर्गा चौक, माळी वाडा, खवले वाडा, शिव चौक, गांधी चौक, जुने बसस्थानक आणि सेलू फाटा मार्गे मार्गक्रमण करत श्री संत गजानन महाराज संस्थान, वाशिम रोड येथे पोहोचली. संपूर्ण मार्गावर भाविकांनी फुलांची उधळण करत आणि दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती.

महोत्सवाचे आयोजन

श्री संत गजानन महाराज संस्थान, वाशिम रोड, मालेगाव यांच्या वतीने या भव्य महोत्सवाचे नेटके आयोजन करण्यात आले आहे. प्रगट दिन सोहळ्यापर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात दररोज शिवमहापुराण कथा आणि कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button