शिक्षणातून सामाजिक परिवर्तन शक्य – कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते

विद्यापीठात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा, कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण
अमरावती :- शिक्षण हीच ती शक्ती आहे, जी समाजात परिवर्तन घडवू शकते. विद्यापीठ हे केवळ पदव्या देणारे केंद्र नसून जबाबदार नागरिक, संशोधक, उद्योजक आणि नेतृत्व घडविणारे एक सशक्त व्यासपीठ असल्याचे प्रतिपादन कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ¬ा उत्साहात साजरा करण्यात आला, त्यानिमित्त मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजस्तंभस्थळी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, विद्यार्थी विकास संचालक डॉ. राजीव बोरकर व श्री राजेश पिदडी उपस्थित होते.
कुलगुरू म्हणाले, 26 जानेवारी 1950 हा दिवस भारताच्या इतिहासातील एक सुवर्णाक्षरी दिवस आहे. या दिवशी आपण स्वतःचे संविधान स्वीकारले आणि भारत एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही प्रजासत्ताक म्हणून जगाच्या पटलावर उभा राहिला. हे संविधान केवळ एक कायदेशीर दस्तऐवज नसून, ते समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचे प्रतीक आहे. गेल्या काही वर्षांत आपल्या विद्यापीठाने शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात लक्षणीय प्रगती केली आहे. विद्याथ्र्यांनी विविध स्पर्धा, संशोधन उपक्रम, स्टार्टअप्स आणि आंतरराष्ट्रीय संधींमध्ये मिळवलेले यश हे आपल्या सामूहिक प्रयत्नांचे फळ आहे.
आजचा काळ हा केवळ ज्ञानाचा नाही, तर कौशल्य, नवकल्पना आणि नैतिक मूल्यांचा आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या माध्यमातून विद्याथ्र्यांना बहुविध संधी, प्रत्यक्ष अनुभव आणि रोजगाराभिमुख शिक्षण देण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या या युगात कृत्रिम बुध्दिमत्ता, डेटा सायन्स, बायोटेक्नॉलॉजी आणि उद्योजकता या क्षेत्रांत भारत जागतिक नेतृत्वाकडे वाटचाल करत आहे. या प्रवासात आपल्या विद्यापीठातील तरुणाईने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. विद्यापीठात नवउद्योजकता रुजविण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात आल्यात आणि लवकरच स्टार्टअप एक्स्पो 2026 चे आयोजन करण्यात येणार आहे. आपले विद्यापीठ हे केवळ शिक्षणाचे केंद्र न राहता आता इन्नोव्हेशन आणि उद्योजकतेचे केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे, याचा कुलगुरू म्हणून सार्थ अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू पुढे म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करीत असतांना विद्याथ्र्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा, यासाठी विद्यापीठाने इंटर्नशीप पोर्टल सुरु केले आहे. तसेच ए.ई.डी.पी. अंतर्गत बी.एस्सी. डाटा सायन्य अॅन्ड अॅनॅलिटीक्स आणि बी.कॉम. रिटेल मॅनेजमेंट हे अभ्यासक्रम सुरु करण्यात आले असून 8 उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आला आहे. आगामी काळात संलग्नित महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी विद्यापीठाने आफ्रिकन आणि इतर देशांतील विद्यापीठांशी संपर्क साधला असून 12 विद्यापीठांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. तसेच इतर संस्थांशी सुद्धा आपण सामंजस्य करार केला असल्याची माहिती कुलगुरूंनी यावेळी दिली.
यावेळी कुलगुरूंनी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्यात. प्रजासत्ताक दिनाला विविध प्राधिकारिणींचे सन्माननीय सदस्य, सर्व संवैधानिक अधिकारी, विविध शैक्षणिक व प्रशासकीय विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ¬ा संख्येने उपस्थित होते.



