पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरूष) स्पर्धेकरिता विद्यापीठाचा संघ घोषित

अमरावती (दि. 01.01.2026)- सौराष्ट्र युनिव्र्हसिटी, राजकोट येथे 27 जानेवारी ते 02 फेब्राुवारी, 2026 दरम्यान होणा-या पश्चिम विभाग आंतर विद्यापीठ क्रिकेट (पुरूष) स्पर्धेकरिता संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचा संघ घोषित करण्यात आला आहे.
चमूंमध्ये श्रीमती केशरबाई लाहोटी महाविद्यालय, अमरावतीचा आदित्य आहुजा, यजवान गाढवे, वेदांत मुळे, सिध्दांत मुळे, विवेक दलवानी, वेदांत जाजू व शुभम तिवारी, इंदिरा महाविद्यालय, कळंबचा वेदांत दिघडे व प्रेम घोडे, श्रीमती साळुंकाबाई राऊत महाविद्यालय, वनोजाचा तुषार सूर्यवंशी, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अॅन्ड टेक्नॉलॉजी, अकोलाचा प्रबल चौखंडे, बी.एस.पाटील महाविद्यालय, परतवाडाचा विशेष तिवारी, दयाभाई पटेल शारीरिक शिक्षण महाविद्यालय, यवतमाळचा आकाश राऊत, विद्याभारती महाविद्यालय, अमरावतीचा मल्हार सिखरे व ऋषिकेश शेलोकार, डॉ. एच.एन. सिन्हा महाविद्यालय, पातूरचा अर्जून इंगळे, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोलाचा भावेश बोपते, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावतीचा परिक्षित सपाटे, डिग्री कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, अमरावतीचा संस्कार जैन व विद्या भवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड रिसर्च, यवतमाळचा पार्थ बोरगांवकर याचा समावेश आहे. निवड झालेल्या सर्व संघाच्या चमूंचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी अभिनंदन केले आहे. चमूंचा प्रशिक्षण वर्ग डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज, अमरावती येथे दि. 15 ते 24 जानेवारी, 2026 दरम्यान होणार असून प्रशिक्षण वर्गाला सर्व खेळाडूंनी उपस्थित रहावे, असे आवाहन क्रीडा व शारीरिक शिक्षण मंडळाच्या संचालक डॉ. तनुजा राऊत यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांचेशी संपर्क साधता येईल.



