Hindi BulletinLatest NewsMaharashtra

सुनहरी मस्जिद पार्किंगमधून निघाल्यानंतर 4 मिनिटांत भीषण स्फोट, तपासात दहशतवादी कटाची शक्यता

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानंतर तपास यंत्रणांना एक महत्त्वाचा धागा सापडला आहे. स्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 कार सुनहरी मस्जिद पार्किंगमध्ये तब्बल 3 तास 29 मिनिटे उभी होती, अशी माहिती सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आली आहे.

तपासात दिसून आलं आहे की, या काळात कारचालक कारमधून बाहेर पडला नव्हता, ज्यामुळे पोलिसांचा संशय अधिक गडद झाला आहे. कार पार्किंगमधून बाहेर पडून केवळ चार मिनिटांत सुभाष मार्गावर स्फोट झाला, हा घटकही तपासाचा केंद्रबिंदू ठरला आहे.

पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे की, कार पार्किंगमध्ये असतानाच स्फोटक ठेवले गेले असावेत, किंवा कारचालकाला कोणाकडून तरी सूचना मिळाल्या असाव्यात. सुनहरी मस्जिद परिसरातील सीसीटीव्हीमधून संशयित व्यक्तीचा फोटो देखील समोर आला आहे.

तपासात हेही समोर आलं आहे की, स्फोटात वापरलेली कार पुलवामातील एका व्यक्तीच्या नावावर नोंदणीकृत होती. या पार्श्वभूमीवर दहशतवादी कटाची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी UAPA आणि विस्फोटक पदार्थ अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या तपासासाठी दिल्ली पोलिसांची एक विशेष टीम जम्मू-काश्मीरला रवाना झाली आहे. राजधानीसह मुंबई आणि इतर प्रमुख शहरांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला असून लाल किल्ला मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक 1 आणि 4 बंद ठेवण्यात आले आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button