India NewsLatest NewsMaharashtra

लाल किल्ला स्फोट: देशभरात हायअलर्ट, दिल्ली हादरली!

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या भीषण स्फोटानं राजधानीचं संतुलन ढासळलं आहे. या स्फोटात ९ जणांचा मृत्यू, तर ३० हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. स्फोटानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

स्फोटात वापरलेली ह्युंदाई i20 कार स्फोटाआधी तब्बल तीन तास पार्किंगमध्ये उभी होती, असं सीसीटीव्ही तपासात आढळलं आहे. या नव्या धाग्यानं दिल्ली पोलिसांच्या तपासाला वेग आला आहे. तपासात काही धोकादायक पुरावेही सापडल्याची माहिती सुरक्षा सूत्रांनी दिली आहे.

स्फोटानंतर लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसर बंद करण्यात आला असून बॉम्ब शोधक पथक आणि फॉरेन्सिक तज्ज्ञ घटनास्थळी तपास करत आहेत. केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सक्रिय झाली असून दिल्लीसह देशभरात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेनंतर देशातील सर्व धार्मिक स्थळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. शिर्डी साई मंदिरात एमएसएफ जवान आणि पोलिस तैनात असून प्रत्येक भाविकाची तपासणी केली जात आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही देखरेख आणि वाहतूक नियंत्रण अधिक कडक करण्यात आलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button