Latest NewsMaharashtra

९ वर्षांच्या मुलीवर ५२ वर्षीय नराधमाने केला बलात्कार

लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील उजेड गावातून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. २ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १.३० ते २.१० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादीच्या माहितीनुसार, त्यांची ९ वर्षांची मुलगी ‘स्वरा’ (नाव बदललेले) हिला मान दुखत असल्याने तिने वडिलांकडून ५ रुपये घेऊन दत्ता मामा नावाच्या व्यक्तीच्या मेडिकल दुकानात गोळी आणण्यासाठी गेली होती. जेव्हा मुलगी सुमारे २.१० वाजता घरी परतली, तेव्हा तिने वडिलांना १५ रुपये दिले. वडिलांनी तिला फक्त ५ रुपये दिल्याचे सांगत, उर्वरित १० रुपये कुठून आले, असे विचारले. तेव्हा मुलीने ‘दत्ता मामा’ यांनी दिल्याचे सांगितले. यानंतर वडिलांनी विचारपूस केल्यावर मुलीने जे सांगितले, ते मन हेलावणारे आहे. मुलीने सांगितले की, दत्ता मामा याने तिला ‘झाडून काढायचे आहे’ असे सांगून मेडिकलच्या वरच्या खोलीत नेले. तिथे तिचे आणि स्वतःचे कपडे काढून तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने वेदना होत असल्याचे सांगितल्यावरही आरोपीने दुर्लक्ष केले. घटनेनंतर आरोपीने मुलीला १५ रुपये देऊन घरी पाठवले. वडिलांनी मुलीची तपासणी केली असता, तिच्या लघवीच्या जागेवर ओलावा आणि पॅन्टवर काहीतरी पांढरे घाण लागल्याचे दिसले. या प्रकारानंतर मुलीच्या वडिलांनी आणि मुलीने तातडीने दत्ता चिमन्नशेट्टे या आरोपीकडे धाव घेतली आणि जाब विचारला. आरोपीने सुरुवातीला नकार दिला, पण मुलीने नेमकी घटना घडलेली जागा दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झाला.
या प्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्यामध्ये आरोपी दत्ता चिमन्नशेट्टे (वय ५२) याच्याविरुद्ध बलात्कार आणि पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कारवाई: पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत आरोपी दत्ता चिमन्नशेट्टे याला अटक केली आहे. पीडित मुलीला उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, लातूर येथे दाखल करण्यात आले आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button