Maharashtra
सोयाबीनच्या भावावरून बाजार समितीत शेतकरी-व्यापाऱ्यामध्यें हाणामारी

वाशिम जिल्ह्यातील कारंजा लाड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मोठा गोंधळ उडाला. सोयाबीनला शासनाने जाहीर केलेल्या हमीभावापेक्षा व्यापाऱ्यांकडून कमी दर दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
काढणीच्या वेळी एकरी फक्त दोन ते तीन पोतीच सोयाबीन निघाले. तरीसुद्धा शेतकऱ्यांनी तेवढेच उत्पादन बाजारात आणून विक्रीसाठी ठेवले.
पण व्यापाऱ्यांनी मातीमोल दर सांगत शेतकऱ्यांचा अपमान केला, असे सांगण्यात येते. विवाद वाढत जाऊन शाब्दिक वादातून हाणामारीपर्यंत प्रकरण गेले.
या घटनेमुळे काही काळ बाजार समितीतील सोयाबीन खरेदी पूर्णपणे ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तणाव शमवला.
शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली असून पोलिस तपास सुरू आहे.



