Accident NewsLatest NewsMaharashtra

समृद्धी महामार्गावर टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण आग

समृद्धी महामार्गावरून दररोज हजारो वाहने नागपूर-मुंबईदरम्यान धावत असतात. अशात चैनल नंबर 106 नजीक एक भीषण अपघातासारखी घटना घडली.
नागपूरहून मुंबईकडे टमाटर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. ट्रकच्या केबिनमधून धूर निघताना पाहताच चालक आणि वाहक यांनी प्रसंगावधान राखत गाडी थांबवली आणि ट्रकमधून बाहेर पडले. क्षणातच ट्रकच्या संपूर्ण बॉडीला आगीने वेढले आणि काही वेळातच वाहन जळून खाक झाले.
घटनेची माहिती समृद्धी महामार्गावरील नियंत्रण कक्षाला मिळताच, धामणगाव नगरपरिषदेच्या अग्निशामक पथकाला तत्काळ रवाना करण्यात आले.
अग्निशामक कर्मचारी घटनास्थळी पोहोचताच आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रकमधील सर्व टमाटर आगीत भस्मसात झाले आहेत. प्राथमिक चौकशीतून हे स्पष्ट झाले आहे की, ट्रकमधील इलेक्ट्रिकल तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागली असावी, असा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. अधिक तपास संबंधित विभागाकडून सुरू आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांच्या सुरक्षेसाठी वेगवेगळे उपाय करण्यात आले असले तरी, अशा प्रकारच्या आगीच्या घटना थांबत नाहीत. प्रवाशांनी वेळोवेळी वाहनांची तपासणी करून अशा दुर्घटना टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button