citynewsDelhihealth safetyIndia NewsLatest News

FSSAI ची मोठी कारवाई; काही रम-व्हिस्की उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स, बॅगपायपर, रॉयल चॅलेंज, एंटिक्विटी ब्लूच्या काही विशिष्ट उत्पादनांवर कारवाई; संपूर्ण ब्रँडवर नाही बंदी

प्रतिनिधी

देशातील मद्य उद्योगासंदर्भात फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) ने मोठी कारवाई करत काही रम आणि व्हिस्की उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासादरम्यान काही उत्पादक कंपन्यांनी न्यूट्रल अल्कोहोल किंवा एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलमध्ये कृत्रिम अथवा ‘नेचर-आयडेंटिकल’ फ्लेवर मिसळून रम आणि व्हिस्कीचा स्वाद तयार केल्याचे आढळल्याचा दावा FSSAI ने केला आहे.

FSSAI च्या म्हणण्यानुसार, रम आणि व्हिस्कीचा नैसर्गिक स्वाद आणि सुगंध हा उत्पादन प्रक्रिया, परिपक्वता (maturation) आणि वापरलेल्या कच्च्या मालातून निर्माण होणे अपेक्षित आहे. मात्र काही उत्पादनांमध्ये कृत्रिम फ्लेवरचा वापर करण्यात आल्याने नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. या कारणास्तव संबंधित उत्पादने ‘सब-स्टँडर्ड’ असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या कारवाईत Old Monk The Legend, Old Monk Gold Reserve, Old Monk XXX Matured Rum, McDowell’s No.1 Rum, Bagpiper Deluxe Whisky, Old Cask Deluxe XXX Rum, Central Provinces Whisky, Antiquity Blue Whisky आणि Royal Challenge Whisky यांच्या काही विशिष्ट उत्पादन युनिटमध्ये तयार करण्यात आलेल्या उत्पादनांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, ही बंदी संबंधित ब्रँडच्या सर्व उत्पादनांवर लागू नसून केवळ नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळलेल्या विशिष्ट उत्पादनांपुरती मर्यादित आहे.

दरम्यान, संबंधित काही उत्पादक कंपन्यांनी FSSAI च्या निर्णयाला आक्षेप घेतला असून, उत्पादनांवरील लेबलिंग विद्यमान नियमांनुसार असल्याचा दावा केला आहे. काही कंपन्यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दादही मागितली आहे. त्यामुळे या प्रकरणाची न्यायालयीन आणि प्रशासकीय प्रक्रिया पुढे सुरू राहणार आहे.

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, ग्राहकांची दिशाभूल करणारे फ्लेवर किंवा अॅडिटीव्हचा वापर नियमबाह्य असून, अशा प्रकरणांमध्ये पुढेही कठोर कारवाई केली जाईल.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button