Latest NewsMaharashtraYavatmal

यवतमाळ जिल्ह्यात मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापनेसाठी अर्ज सुरू

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाकडून मृद चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२५-२६ या वर्षासाठी १० लाख ८० हजार मृद नमुन्यांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये दोन लाख २२ हजार नमुने ग्रामस्तरीय प्रयोगशाळांद्वारे तपासले जातील. या योजनेनुसार, यवतमाळ जिल्ह्यासाठी १५ नवीन प्रयोगशाळा उभारण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या प्रयोगशाळांसाठी इच्छुक युवक-युवती (वय १८ ते २७), स्वयं-साहाय्यता गट, शेतकरी उत्पादक संस्था, आणि विविध कार्यकारी सहकारी संस्था अर्ज करू शकतात. या योजनेसाठी प्रत्येक प्रयोगशाळेला १.५० लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाईल. अर्जदाराची शैक्षणिक पात्रता किमान १० वी उत्तीर्ण असावी, तसेच विज्ञान आणि संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की, आधारकार्ड आणि पॅनकार्ड जोडावे लागतील. इच्छुकांनी आपले अर्ज १२ सप्टेंबरपर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सादर करायचे आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button