Latest NewsMaharashtra

विरारमध्ये भीषण रेल्वे अपघात! ट्रेनच्या धडकेमुळे ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

Virar : मुंबईजवळील विरारमध्ये भीषण रेल्वेअपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. विरारच्या नारंगी फाटकाजवळ एक्स्प्रेस ट्रेनची ६५ वर्षीय वृद्ध व्यक्तीचा धडक झाली. या धडकेमुळे वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेतला जात असल्याचे रेल्वे पोलिसांनी म्हटले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरारच्या नारंगी फाटकाजवळ अपघात घडला. जयपूर-बांद्रा एक्स्प्रेस ट्रेनची एका ६५ वर्षीय व्यक्तीला धडक बसली. या दुर्घटनेमध्ये त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. जयपूर बांद्रा एक्स्प्रेस ट्रेन ही मुंबईकडे जात असताना विरार रेल्वे स्थानकाच्या बाजूला ही घटना घडली आहे. अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

विरार रेल्वे स्थानकाजवळ घडलेल्या अपघातामुळे काहीकाळ एक्स्प्रेस ट्रेन थांबवण्यात आली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. मृतदेहाच्या नातेवाईकांचा शोध सुरु असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माध्यमांना दिली आहे.

विरार लोकल स्टेशनमध्ये तिकीट तपासणीवरुन वाद झाला. विरार फास्ट लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्या व्यक्तीने तिकीट तपासणाऱ्या अधिकाऱ्यांशी भांडण केले. दादार ते बोरीवली दरम्यान पहिल्या वर्गाच्या डब्यात प्रवासी दुसऱ्या वर्गाचे तिकीट घेऊन प्रवास करत होते. तिकीट विचारल्यानंतर या प्रवाशांनी कर्मचाऱ्यांवर हल्ला करत रेल्वेच्या संपत्तीची तोडफोड केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button