AmravatiLatest News

मनपा शाळा व अ‍ॅकॅडमी मैदानाची आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी केली पाहणी

अमरावती : महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी आज पश्चिम झोन क्रमांक ५ अंतर्गत प्रभाग क्रमांक १५ छायानगर येथील मनपा शाळा क्र.३ आणि अ‍ॅकॅडमी मैदानाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान परिसरातील स्वच्छतेची पाहणी करण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सुधारणा व स्वच्छतेसंदर्भात स्पष्ट सूचना देण्यात आल्या.

पाहणीदरम्यान मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय जाधव, सहाय्यक आयुक्त नंदकिशोर तिखिले, शिक्षणाधिकारी डॉ.प्रकाश मेश्राम, उपअभियंता विवेक देशमुख, ज्येष्ठ स्वच्छता निरीक्षक राजेश राठोड तसेच स्वच्छता निरीक्षक उपस्थित होते. परिसरातील स्वच्छता राखण्यासाठी नियमित साफसफाई, कचरा व्यवस्थापन व शाळेच्या आवारातील स्वच्छता यावर भर देण्याच्या सूचनाही यावेळी आयुक्तांनी दिल्या.
महानगरपालिकेच्या वतीने शाळा व परिसर स्वच्छ, सुरक्षित आणि विद्यार्थ्यांसाठी अनुकूल ठेवण्याच्या दृष्टीने नियमित पाहण्या व कारवाई करण्यात येत असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button