Amaravti GraminLatest News

धारणी आशा वर्कर भरतीवर वाद! – अपात्रांची निवड, पात्र महिलांचा संताप

धारणी: धारणी शहरात आशा वर्कर भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता पाळली गेली नाही असा आरोप काही महिला उमेदवारांनी केला आहे. पात्र असूनही संधी नाकारण्यात आली, अपात्रांना भरती करण्यात आलं, अशी गंभीर तक्रार करत महिलांनी आता आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शासकीय नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य असावी हीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. धारणीतील महिलांचा हा आक्रोश केवळ एक भरती नव्हे, तर व्यवस्थेतील अन्यायाविरोधातला लढा आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे!
धारणी शहरातील आशा वर्कर भरती प्रक्रिया सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सात प्रभागांसाठी ही भरती प्रक्रिया कलमखार उपकेंद्रात पार पडली होती. मात्र अनेक महिलांचा आरोप आहे की ही संपूर्ण प्रक्रिया गैरप्रकाराने राबवण्यात आली आहे. पात्र महिलांना डावलून अयोग्य उमेदवारांची निवड करण्यात आली, अशी त्यांची स्पष्ट भूमिका आहे. या भरती प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेविरोधात महिलांनी आज उपविभागीय अधिकारी, तहसीलदार कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, तसेच तालुका व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला. त्यांची मागणी स्पष्ट आहे – ही प्रक्रिया रद्द करण्यात यावी आणि पुन्हा एकदा पारदर्शक पद्धतीने राबवावी. महिलांनी इशारा दिला आहे की, जर त्यांचा अर्जाचा विचार झाला नाही, तर त्या उपोषणाला बसणार आहेत. “आम्ही पात्र असूनही आमच्या कडे दुर्लक्ष करण्यात आलं! सत्ताधाऱ्यांच्या ओळखीच्या महिलांना निवडण्यात आलं, हे आम्ही
“शासकीय नोकरभरती प्रक्रिया पारदर्शक आणि न्याय्य असावी हीच सर्वसामान्यांची अपेक्षा असते. धारणीतील महिलांचा हा आक्रोश केवळ एक भरती नव्हे, तर व्यवस्थेतील अन्यायाविरोधातला लढा आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने पाहतं का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे!”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button