Amaravti GraminLatest News

अचलपूर गहू बाजारात चोरीचा थरार – चोर पकडला! ₹1.5 लाखांची रोकड वाचली

अचलपूर: अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवारी दुपारी मोठा थरार घडला. गव्हाच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या आवकेनंतर बाजार समिती परिसरात शेतकऱ्यांची प्रचंड गर्दी होती. याच गर्दीचा फायदा घेत एका अज्ञात चोरट्याने बाजार समितीचे माजी संचालक बंडू अग्रवाल यांच्या दुकानातून तब्बल दीड लाख रुपयांची रोकड लंपास करण्याचा प्रयत्न केला.

मात्र, बाजारात उपस्थित असलेल्या काही सतर्क शेतकऱ्यांनी या चोरट्याला रंगेहात पकडत धाडस दाखवलं! त्यांनी त्याचा पाठलाग करत बाजार समितीच्या आवारातच त्याला अडवलं आणि तात्काळ परतवाडा पोलिसांना माहिती दिली.

पोलीस काहीच वेळात घटनास्थळी दाखल झाले आणि चोरट्याला ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे, बंडू अग्रवाल यांची पूर्ण रोकड पोलिसांनी परत मिळवून दिली आहे. या घटनेमुळे बाजार समितीतील रोख व्यवहारांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button