amravati
-
Amravati
राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांची नियुक्ती झाल्याबद्दल डॉ मनीष गवई यांनी केले केंद्रीय मंत्री श्री रामदास आठवले समवेत अभिनंदन
अमरावती : देशभरातील अतिशय महत्त्वाचा समजला जाणाऱ्या आणि प्रसिद्ध असलेल्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या श्रीनगरच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्सचे अध्यक्षपदी भारत सरकारचे…
Read More » -
Amravati
अमरावतीत सोशल मीडियावर घातक शस्त्रासह फोटो व्हायरल करणाऱ्या तरुणावर गुन्हे शाखेची कारवाई
अमरावती : सोशल मीडियावर घातक शस्त्रासह फोटो व्हायरल करून नागरिकांमध्ये दहशत पसरवणाऱ्या तरुणावर अमरावती शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली…
Read More » -
Amravati
अमरावतीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर; आयएएस आकाश वर्मा आणि उपजिल्हाधिकारी सुनील टाकळे मार्गदर्शन करणार
अमरावती, दि. 18 : जिल्हा प्रशासन अमरावतीच्या वतीने स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर क्र. 3’ चे…
Read More » -
Amravati
मा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आज अमरावती विमानतळावर सकाळी आगमन झाले
अमरावती त्यांच्या आगमनावेळी जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी पुष्पगुच्छ देऊन औपचारिक स्वागत केले. यावेळी प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, पोलीस अधिकारी तसेच स्थानिक…
Read More » -
Amravati
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावतीत राजकीय हालचालींना वेग
अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार रवी राणा यांनी…
Read More » -
Amravati
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात प्रशासनाची पत्रकार परिषद
अमरावती महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ संदर्भात आज एक महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद पार पडली. ही पत्रकार परिषद अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्या…
Read More » -
Amravati
गो. से. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिला बी.ए. कला शाखेतून अमरावती विद्यापीठात प्रथम मेरिट
ग्रामीण जगण्याला प्रेरणा देणारी असामान्य कामगिरी खामगाव :- पिंपळगाव राजा (ता. खामगाव) या छोट्याशा ग्रामीण भागातील रहिवासी तसेच गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील विद्यार्थिनी कु. सफिया बेगम सरफराज बेग हिने आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण विद्यापीठाचा गौरव वाढविला आहे. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बी.ए. (कला) शाखेच्या परीक्षेत 9.06 CGPA प्राप्त करून तिने प्रथम मेरिट मिळवली आहे. साध्या परिस्थितीत शिक्षण घेत असतानाही उत्कृष्ट यश संपादन करता येते, याचे उत्तम उदाहरण कु. सफिया बेगम सरफराज बेग हिने सर्वांसमोर ठेवले आहे. तिचे प्राथमिक शिक्षण 1ली ते 8वी स्थानिक गुलशन-ए-हाफिज उर्दू प्राथमिक शाळेत झाले, तर 8वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, पिंपळगाव राजा येथे पूर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत तिने 89.20 टक्के मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला, तर बारावी परीक्षेत तिने 88.33 टक्के गुणांची कमाई केली. या दोन्ही परीक्षांमधील सातत्यपूर्ण गुणवत्तेमुळे ती पुढील उच्च शिक्षणातही चमकेल याची पावती तेव्हाच मिळाली होती. उच्च शिक्षणासाठी तिने खामगाव येथील गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथे प्रवेश घेतलाआणि येथेही तिची मेहनत, नियमितता आणि प्रत्येक विषयाकडे जबाबदारीने पाहण्याची वृत्ती कायम राहिली. तिची शिस्त, अभ्यासावरील निष्ठा आणि विषयांचे उत्कृष्ट आकलन या सर्वांचा परिणाम म्हणून ती संपूर्ण विद्यापीठात पहिल्या क्रमांकावर पोहोचली. तिच्या या अभूतपूर्व यशामुळे खामगाव तालुका, महाविद्यालय आणि पिंपळगाव राजा गावात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शिक्षक, ग्रामस्थ, प्राध्यापक आणि मित्रपरिवाराने तिच्या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले आणि अभिमान व्यक्त केला. सफियाची कौटुंबिक पार्श्वभूमी साधी असली तरी शिक्षणाबद्दलचा ठाम विश्वास आणि पालकांच्या संस्कारांनी तिचा आत्मविश्वास अधिक दृढ केला. तिचे वडील सरफराज बेग शकूर बेग यांचे शिक्षण 9वीपर्यंत झाले असून पिंपळगाव राजा येथे ‘गॅलेक्सी स्पेअर पार्ट्स’चे दुकान ते चालवतात. आई सुलताना बेगम यांचे शिक्षण 7वीपर्यंत झाले असून त्या गृहिणी आहेत. साध्या आर्थिक परिस्थिती असूनही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. सफियाला दोन लहान बहिणी आणि एक भाऊ आहे. सादिया बेगम सध्या दहावीमध्ये शिकत असून पिंपळगाव राजा टॅलेंट सर्च (PTS) परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळवून तिला टॅब्लेट पारितोषिक मिळाले. तिसरी बहीण सालिहा बेगम 9वीत असून तिने शिष्यवृत्ती परीक्षेत तृतीय क्रमांक मिळवून आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली आहे. भाऊ मुज्जमिल बैग सध्या 2रीत शिक्षण घेत आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वातील शिस्त, अभ्यासातील सातत्य आणि विषयांवरील पकड याचे विशेष कौतुक केले. उर्दू विभाग प्रमुख प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी तिच्या शांत, अभ्यासू आणि जिद्दी वृत्तीचा उल्लेख करून उर्दू, इंग्रजी, इंग्रजी साहित्य, इतिहास आणि पर्शियन या विषयांतील तिच्या सातत्यपूर्ण गुणवत्तेचे कौतुक केले. सफिया बेगमचे संपूर्ण यश पाहता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही मोठी स्वप्ने पाहता येतात आणि कठोर परिश्रम, चिकाटी व आत्मविश्वास यांच्या जोरावर ती स्वप्ने पूर्णही करता येतात हे तिने सिद्ध केले आहे. पिंपळगाव राजा ते अमरावती विद्यापीठ असा तिचा प्रवास अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या यशामुळे पिंपळगाव राजा गावाचे नाव विद्यापीठात आणि संपूर्ण समाजात अभिमानाने उजळले आहे.
Read More » -
Amravati
विद्यापीठाच्या आचार्य पदवी प्रवेशास … मुदतवाढ अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात
अमरावती (दि. 17.12.2025) : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या आचार्य पदवी प्रवेशाची अधिसूचना यापूर्वी प्रकाशित करण्यात आलेली आहे. तथापि विनंतीवरुन…
Read More » -
Amravati
सोन्या–चांदीच्या दरात वाढ
मुंबई/अमरावती, दि. ___ : सराफा बाजारात आज सोन्या–चांदीच्या दरात वाढ नोंदविण्यात आली आहे. २४ कॅरेट शुद्ध सोन्याचा दर प्रति ग्रॅम…
Read More » -
Amravati
असंघटीत कामगारांच्या विकासासाठी प्रभावी योजना राबवाव्यात – जिल्हाधिकारी आशिष येरेकर
अमरावती, दि. 16 डिसेंबर: कामगार विभागामार्फत असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असून, येत्या काळात कामगार व त्यांच्या कुटुंबांच्या…
Read More »