Latest News
-
गो. से. महाविद्यालयात “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताहाचा भव्य शुभारंभ
“स्त्री–पुरुष समानता प्रत्यक्ष कृतीतूनच साकार होईल” – सौ. श्रद्धाताई बोबडे खामगाव : विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव संचलित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय, खामगाव येथील महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या वतीने आयोजित “जागर स्त्री–पुरुष समानतेचा” सप्ताह (दि. ३ ते १२ जानेवारी २०२६) चा भव्य उद्घाटन समारंभ दिनांक ३ जानेवारी २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या विशेष सप्ताहाचे उद्घाटन मा. डॉ. गीताली पुंडकर (प्राचार्या, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे (संचालिका, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ, खामगाव), डॉ. कांचनताई थोरात (वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मलकापूर) तसेच नयन काळमेघ (गृहअर्थशास्त्र विभाग, कला महाविद्यालय, अकोला–मलकापूर) उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. अशोक पडघन होते. कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून डॉ. रेश्मा मारवाडी यांनी जबाबदारी पार पाडली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व माँ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. स्त्री–पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन व सामाजिक जागृती या अत्यंत महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवून या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहांतर्गत सावित्रीबाई फुले जयंती, माँ जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती या प्रेरणादायी दिनांचे औचित्य साधत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निबंध स्पर्धा, सेल्फ डिफेन्स ट्रेनिंग प्रोग्राम, शिवणकला व फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, उद्योजकता मार्गदर्शन व्याख्यान, पथनाट्य, जी. एस. पतंगोत्सव तसेच विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. उद्घाटक डॉ. गीताली पुंडकर यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात स्त्री– पुरुष समानता, महिलांचे सक्षमीकरण व शिक्षणाचे महत्त्व विशद करत विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन केले. प्रमुख अतिथी मा. सौ. श्रद्धाताई प्रशांत बोबडे यांनी आपल्या विशेष भाषणात सांगितले की, स्त्री–पुरुष समानता ही केवळ संकल्पना नसून ती प्रत्यक्ष कृतीतून समाजात रुजवणे अत्यंत गरजेचे आहे. महिलांना शिक्षण, संधी व सुरक्षित वातावरण मिळाल्यास त्या कुटुंब, संस्था आणि समाजाच्या प्रगतीसाठी प्रभावी योगदान देऊ शकतात. विद्यार्थिनींनी आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवावा, तर विद्यार्थ्यांनीही समानतेचा दृष्टिकोन अंगीकारून महिलांच्या प्रगतीला साथ द्यावी, असे त्यांनी प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ. अशोक पडघन यांनी विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्वगुण विकसित करावेत तसेच महिलांच्या सक्षमीकरणासाठी सकारात्मक दृष्टीकोन अंगीकारावा, असे मार्गदर्शन केले. हा सप्ताह विद्यार्थ्यांमध्ये व विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास, स्वावलंबन, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूनम तिवारी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. कोमल काळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. संगीता वायचाळ, डॉ. नीता बोचे, डॉ. रोहिणी धरमकर, कु. भाग्यश्री सापधारे, श्री. अभय मोहिते, श्री. विठ्ठल चंदनकर, श्री. लक्ष्मण पालवे, श्री. अरविंद लांडे, सौ. स्वाती खोडके, शारदा इंगळे, अंजली करंगळे, पूजा बोचरे, ऋतुजा वानखडे यांनी मोलाचे सहकार्य केले. तसेच दीक्षा खोडे या विद्यार्थिनीने क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत सादर केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.
Read More » -
नागपूर शहर गुन्हे शाखा युनिट–3 ची मोठी कारवाई
दोन गंभीर गुन्ह्यांचा छडा; ३ आरोपी ताब्यात, साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट–3 पथकाने आज…
Read More » -
राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना सन 2025-26 साठी अर्ज करण्यास मुदतवाढ
अमरावती, दि. 05 (जिमाका): देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी…
Read More » -
नागपूर : कपिल नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांची मोठी कारवाई, ४० हजारांचा मुद्देमाल जप्त
नागपूर नागपूर शहरातील कपिल नगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ४० हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त…
Read More » -
कर्जदारांना मोठा दिलासा: रिकव्हरी एजंट आता धमकावू शकणार नाहीत, RBI ने लागू केले कडक नियम!
नवी दिल्ली: कर्ज घेणे ही एखाद्या व्यक्तीची आर्थिक मजबूरी असू शकते, मात्र वसुलीच्या नावाखाली त्याला धमकावणे किंवा त्याचा अपमान करणे…
Read More » -
नागपुरात धक्कादायक घटना : किरकोळ वादातून मित्रांकडूनच मित्राची निर्घृण हत्या, एक गंभीर जखमी
नागपूर नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना…
Read More » -
अमरावती महानगरपालिका निवडणूक : बडनेरा झोन २२ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रचार कार्यालयाचा उत्साहात उद्घाटन
अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडनेरा झोन क्रमांक २२ मध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, राष्ट्रवादी काँग्रेस – अजित पवार…
Read More » -
अमरावती महानगरपालिका निवडणूक : प्रभाग १९ साईनगरमध्ये युवा स्वाभिमान पक्षाच्या प्रचाराचा भक्तिमय शुभारंभ
अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रभाग क्रमांक १९, साईनगरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पाहायला मिळाले. युवा स्वाभिमान पक्षाच्या…
Read More »

