‘लाइफ ऑफ चाय’ दुकानाचे शटर उचकटून चोरी; सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी जेरबंद

स्नेह नगर बस स्टॉपसमोरील दुकानातून १२ हजारांची रोकड आणि मोबाईल लंपास; राणाप्रतापनगर पोलिसांची कारवाई, चोरीचा मोबाईल जप्त
नागपूर : शहरातील स्नेह नगर परिसरात दुकानाचे शटर उचकटून चोरी करणाऱ्या आरोपीला राणाप्रतापनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्नेह नगर बस स्टॉपसमोर असलेल्या ‘लाइफ ऑफ चाय’ या दुकानात चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीला गेलेला पोको कंपनीचा मोबाईल फोनही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने ‘लाइफ ऑफ चाय’ दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १२ हजार रुपये रोख आणि अंदाजे ६ हजार रुपये किमतीचा पोको कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. दुकानात चोरी झाल्याचे लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राणाप्रतापनगर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. या फुटेजच्या आधारे पोलिसांनी राजा उर्फ अमरावती सलीम खान याला ताब्यात घेतले. पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती आहे.
आरोपीकडून चोरीला गेलेला मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला आहे. मात्र, चोरी केलेल्या १२ हजार रुपयांच्या रोख रकमेचा शोध अद्याप सुरू असून, या गुन्ह्यात अन्य कोणी सहभागी होते का, याचाही त



