Accident NewscitynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात मनपा बसची मॉर्निंग वॉकला निघालेल्या व्यक्तीला धडक; राजीव शाह यांचा जागीच मृत्यू

अजनी चौकातील अजित बेकरीसमोर भीषण अपघात; धडकेनंतर बस मेट्रोच्या पिलरवर आदळली, चालक घटनास्थळावरून फरार

नागपूर : शहरातील अजनी चौक परिसरात रविवारी सकाळी भीषण अपघात घडला. अजित बेकरीसमोर भरधाव मनपा बसने मॉर्निंग वॉकसाठी निघालेल्या राजीव शाह यांना जोरदार धडक दिली. या अपघातात शाह यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर अनियंत्रित झालेली बस थेट मेट्रोच्या पिलरवर जाऊन आदळली.

मिळालेल्या माहितीनुसार, राजीव शाह हे नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. अजनी चौकातील अजित बेकरीसमोरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या मनपा बसने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

या घटनेनंतर बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोर असलेल्या मेट्रोच्या पिलरवर जाऊन आदळली. या धडकेत बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, बसचा समोरील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.

अपघातानंतर बस चालक घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठविण्यात आला. अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

दरम्यान, फरार बसचालकाचा पोलीस शोध घेत असून, अपघात नेमका कशामुळे घडला, याचा पुढील तपास सुरू आहे. भरधाव बसमुळे एका नागरिकाचा जीव गेल्याने शहरातील रस्ते सुरक्षा आणि सार्वजनिक वाहतुकीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button