citynewsWashim

NHM मधील २२४ कंत्राटी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे शासकीय सेवेत समायोजन; रक्तदानातून सामाजिक बांधिलकी जपली!

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी पुढाकार; समायोजित अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून रक्तदान शिबिराचे आयोजन

वाशिम : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) वाशिम जिल्ह्यात कार्यरत असलेल्या २२४ कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अधिसंख्य पदांवर समायोजन करून शासनाने त्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले आहे. या निर्णयानंतर सामाजिक बांधिलकी जपत या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आता समाजोपयोगी उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे.

वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याची बाब लक्षात घेता, या कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तपेढीतील रक्तसाठा वाढावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

शासकीय सेवेत समायोजन झाल्यानंतर केवळ आपल्या सेवाभावी कार्यापुरते मर्यादित न राहता समाजाप्रती असलेली जबाबदारी जपण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जात असून, या शिबिरामुळे गरजू रुग्णांना आवश्यकतेच्या वेळी रक्त उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

दरम्यान, रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. आरोग्य क्षेत्रात कार्यरत असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपल्याने हा उपक्रम इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button