AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

महायुतीच्या विजयात लप्पीभैय्या आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान!

आमदार किरण सरनाईक यांनी निवासस्थानी जाऊन मानले आभार; कार्यकर्त्यांच्या योगदानाचे केले कौतुक

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरण रामराव सरनाईक यांनी अमरावतीतील सुप्रसिद्ध समाजसेवक चंद्रकुमार जाजोदिया ऊर्फ लप्पीभैय्या यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देत त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आभार मानले. महायुतीच्या विजयात लप्पीभैय्या आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल आमदार सरनाईक यांनी विशेष कौतुक केले.

निवडणुकीच्या काळात लप्पीभैय्या आणि त्यांच्या टीमने महायुतीच्या समर्थनार्थ समर्पित भावनेने, मेहनतीने आणि निष्ठेने काम केले. त्यांच्या टीमने दिलेले सहकार्य आणि सक्रिय सहभाग हा विजयाच्या प्रवासातील महत्त्वाचा भाग ठरल्याचे आमदार सरनाईक यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोरही योगदानाचा उल्लेख

विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असतानाही आमदार किरण सरनाईक यांनी लप्पीभैय्या आणि त्यांच्या टीमने केलेल्या कार्याचा आवर्जून उल्लेख केला होता. महायुतीच्या विजयात त्यांच्या टीमची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल्याचे त्यांनी नमूद केले.

आमदार सरनाईक यांनी स्वतः लप्पीभैय्या यांच्या घरी जाऊन आभार व्यक्त केल्याने त्यांच्या सामाजिक आणि संघटनात्मक कार्याची दखल घेतल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण

या सदिच्छा भेटीमुळे लप्पीभैय्या आणि त्यांच्या टीममधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळातही सामाजिक आणि संघटनात्मक कार्य अधिक जोमाने करण्यासाठी या भेटीतून नवी प्रेरणा मिळाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button