citynews

फायनान्स कंपन्यांची दादागिरी खपवून घेणार नाही; बच्चू कडू यांचा इशारा

कितीही गुंड पोसले, तरी तुमच्या दादागिरीला पुरून उरण्याची हिंमत आमच्यात आहे’; अकोल्यातील कुटुंबाला दिला आधार

अकोला : “फायनान्सवाल्यांनी कितीही गुंड पोसले, तरी लक्षात ठेवा… तुमच्या दादागिरीला पुरून उरण्याची हिंमत आमच्यात आहे!” असा आक्रमक इशारा विधान परिषदेचे आमदार आणि शिवसेनेचे नेते बच्चू कडू यांनी दिला आहे.

अकोला येथे नुकत्याच घडलेल्या एका प्रकरणात फायनान्स कंपनीने एका कुटुंबाच्या घराला लावलेले कुलूप बच्चू कडू यांनी तोडून संबंधित कुटुंबाला आधार दिला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी फायनान्स कंपन्यांच्या कथित दादागिरीविरोधात ठाम भूमिका मांडत इशारा दिला.

फायनान्स कंपन्यांनी वसुलीच्या नावाखाली दादागिरी करू नये, असा स्पष्ट संदेश त्यांच्या या भूमिकेतून देण्यात आला आहे. त्यांच्या या वक्तव्याची चर्चा सुरू झाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button