मेयो रुग्णालयात मध्यरात्री राडा! एका ॲम्ब्युलन्स चालकावर १० रुग्णवाहिकांची तोडफोड केल्याचा आरोप

तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल; शासकीय रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
नागपूर : नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा मेयो रुग्णालय परिसरात मध्यरात्री रुग्णवाहिका चालकांमध्ये वाद झाल्याची घटना समोर आली आहे. एका ॲम्ब्युलन्स चालकाने इतर तब्बल दहा रुग्णवाहिकांची तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेनंतर संबंधित ॲम्ब्युलन्स चालकांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

रुग्णांना सेवा देण्यासाठी मेयो रुग्णालय परिसरात उभ्या असलेल्या रुग्णवाहिकांचे या घटनेत नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. एका चालकाकडूनच इतर दहा ॲम्ब्युलन्सची तोडफोड करण्यात आल्याचा आरोप संबंधित चालकांनी केला आहे. मात्र, हा वाद नेमका कोणत्या कारणातून सुरू झाला आणि तोडफोडीमागील पार्श्वभूमी काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
शहरातील प्रमुख शासकीय रुग्णालयाच्या परिसरातच असा प्रकार घडल्याने रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. रुग्णवाहिका चालकांमधील वादाचे रूपांतर तोडफोडीत कसे झाले, याची चौकशी होणे गरजेचे आहे.
या घटनेनंतर सिटी न्यूजने घटनास्थळी पोहोचून संबंधित ॲम्ब्युलन्स चालकांशी संवाद साधला. त्यांनी या प्रकरणाबाबत आपली बाजू मांडली असून, संपूर्ण घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी पाहूया रूपा पंडित यांचा हा एक्सक्लुझिव्ह स्पेशल रिपोर्ट!
सिटी न्यूज नागपूर – बातमी मोठी, सर्वात आधी!



