AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या पहिल्या फेरीत काँग्रेसला धक्का! अदिती पोहरे चौथ्या क्रमांकावर

किरण सरनाईक ३,९०३ मतांसह आघाडीवर; श्रीकांत देशपांडे दुसऱ्या, तर अपक्ष सुरेश देवकर तिसऱ्या क्रमांकावर

अमरावती | सिटी न्यूज

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत पहिल्या फेरीचे निकाल समोर आले असून, काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना अपेक्षित आघाडी मिळालेली नाही. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये पोहरे चौथ्या क्रमांकावर असून, त्यांना १,३१९ मते मिळाली आहेत. दुसरीकडे, महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी ३,९०३ मते मिळवत आघाडी घेतली आहे.

पहिल्या फेरीतील उमेदवारनिहाय मते

  • किरण सरनाईक (महायुती) – ३,९०३ मते
  • श्रीकांत देशपांडे (शिवसेना बंडखोर) – २,२०९ मते
  • सुरेश देवकर (अपक्ष) – १,५८२ मते
  • अदिती पोहरे (काँग्रेस) – १,३१९ मते
  • दत्तात्रय लहाने (उबाठा) – १,१६९ मते
  • संगीता शिंदे (भाजप बंडखोर) – ६९८ मते
  • शेखर भोयर (भाजप बंडखोर) – ४३२ मते

काँग्रेसच्या रणनीतीपुढे आव्हान?

पहिल्या फेरीत अदिती पोहरे चौथ्या क्रमांकावर राहिल्याने काँग्रेससाठी हा निकाल धक्कादायक मानला जात आहे. महायुतीचे किरण सरनाईक यांनी सुरुवातीपासून आघाडी घेतली असून, श्रीकांत देशपांडे आणि अपक्ष सुरेश देवकर यांनीही पहिल्या फेरीत चांगली मते मिळवली आहेत.

मात्र, शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम निकालासाठी पुढील मतमोजणी आणि निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. पहिल्या फेरीतील आकडेवारीवरून अंतिम निकालाचा निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल.

सिटी न्यूज | अमरावती शिक्षक मतदारसंघ निवडणूक २०२६

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button