citynewsLatest NewsMaharashtraWardha

वनविभागाच्या भिंती झाल्या विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कॅनव्हास; वन्यजीव संवर्धनाचा दिला भावनिक संदेश

वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात वन्यजीव सप्ताहानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनाचा अनोखा संदेश दिला आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुंचल्यातून वनविभागाच्या भिंतींवर विविध रंगांची उधळण करत मनमोहक चित्रे साकारली आहेत. त्यामुळे या भिंती आता केवळ भिंती न राहता विद्यार्थ्यांच्या कलाविष्काराचे कॅनव्हास बनल्या आहेत.


वन्यजीव सप्ताहाचे औचित्य साधत आर्वी तालुक्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाघ, बिबट्या, हरीण, विविध पक्षी, झाडे आणि निसर्गाशी संबंधित अनेक चित्रे विद्यार्थ्यांनी भिंतींवर साकारली.

रंगांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी वन वाचवा, वन्यजीव वाचवा असा हृदयस्पर्शी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या चित्रांमुळे वनविभागाच्या परिसराला एक वेगळेच आकर्षण प्राप्त झाले आहे.

भिंतीवर चित्र रंगवताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. आपल्या कलेतून निसर्ग आणि वन्यजीवांप्रती असलेले प्रेम व्यक्त करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची जाणीवही अधोरेखित केली.

लहान वयातच विद्यार्थ्यांच्या मनात वन्यजीव आणि पर्यावरण संवर्धनाची भावना रुजावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या कलाकृतींमधून देण्यात आलेला हा संदेश नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे.

बाईट : सनी हजारें, कला शिक्षक


विद्यार्थ्यांच्या कुंचल्यातून साकारलेल्या या रंगबेरंगी चित्रांमुळे वनविभागाच्या भिंतींना नवा साज मिळाला असून, त्यातून निसर्ग संवर्धनाचा संदेशही अधिक प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button