AmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीत दुचाकीस्वारांवर झाडाच्या फांद्या कोसळल्या; 3 युवकांसह विद्यार्थिनी आणि बाळ जखमी

अमरावती : शहरातील गर्ल्स हायस्कूल चौक ते पोलीस पेट्रोल पंप आणि रिझर्व्ह लाईनकडे जाणाऱ्या मार्गावर अचानक निंबाच्या झाडाच्या फांद्या दुचाकीस्वारांच्या अंगावर कोसळल्याची घटना घडली. या घटनेत तीन युवक, एक विद्यार्थिनी आणि एका लहान बाळाला दुखापत झाल्याची माहिती आहे.

रस्त्यावरून दुचाकीने जात असताना अचानक झाडाच्या मोठ्या फांद्या खाली कोसळल्याने काही दुचाकीस्वारांना त्याचा फटका बसला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

पावसाळ्यापूर्वी रस्त्यालगत असलेल्या धोकादायक झाडांच्या आणि फांद्यांच्या छाटणीची आवश्यकता असते. मात्र, संबंधित झाडांच्या धोकादायक फांद्या वेळेत कापण्यात आल्या नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या घटनेनंतर रस्त्याच्या कडेला असलेल्या धोकादायक झाडांचा आणि फांद्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर अशा प्रकारच्या धोकादायक फांद्यांची पाहणी करून आवश्यक छाटणी करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, या घटनेला नेमकी कोणती परिस्थिती कारणीभूत ठरली आणि धोकादायक फांद्यांबाबत यापूर्वी कोणती कार्यवाही करण्यात आली होती, याबाबत संबंधित प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

अधिक स्थानिक आणि ताज्या बातम्यांसाठी City News ला Subscribe करा.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button