citynewsLatest NewsMaharashtra

#citynews

शवविच्छेदन अहवालात श्वासावरोध आणि हृदयविकाराचा उल्लेख; वलगाव पोलिसांकडून तपास सुरूवलगाव

वलगाव परिसरात BAMS डॉक्टर आदित्य रावटे यांच्या संशयास्पद मृत्यूने खळबळ उडाली आहे. डॉ. रावटे हे वलगावजवळील आष्टी गावचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्राथमिक माहितीनुसार, गोरेपणासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधाच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून अधिकृत तपासानंतरच याबाबत निश्चित माहिती समोर येणार आहे.डॉ. आदित्य रावटे यांना बालपणापासून अपस्माराचा त्रास असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, शवविच्छेदन अहवालात श्वासावरोध आणि हृदयविकाराशी संबंधित कारणांचा उल्लेख असल्याची माहिती मिळत आहे.या प्रकरणाचा तपास वलगाव पोलीस करत असून, डॉ. रावटे यांच्या मृत्यूमागील नेमके कारण तसेच मृत्यूच्या परिस्थितीचा तपास केला जात आहे.

तपासातून पुढे येणाऱ्या अधिकृत माहितीवरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.या घटनेमुळे वलगाव आणि परिसरात चर्चेला उधाण आले असून, पोलिसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button