citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

जरीपटका पोलीस ठाण्यातच लाचखोरीचा धक्कादायक प्रकार!

४० हजारांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात; पोलीस ठाण्याच्या आवारातच कारवाई

नागपूर | प्रतिनिधी

नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यातच लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार सचिन तायडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. विशेष म्हणजे, पोलीस ठाण्याच्या आवारातच ही कारवाई करण्यात आल्याने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका विवाहित महिलेच्या कौटुंबिक वादातून हे प्रकरण समोर आले. संबंधित महिलेच्या पतीला पत्नीचे तिच्या पुतण्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या कारणावरून महिला काही दिवस माहेरी राहत होती. तसेच पतीने तिला पैसे देणेही बंद केले होते.

यानंतर संबंधित महिला तिच्या पुतण्यासोबत तक्रार देण्यासाठी जरीपटका पोलीस ठाण्यात आली होती. याच प्रकरणात पोलीस हवालदार सचिन तायडे याने कथितरित्या ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर तडजोड होऊन लाचेची रक्कम ४० हजार रुपयांवर ठरल्याची माहिती आहे.

ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी तायडेने संबंधित व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावले. दरम्यान, एसीबीच्या पथकाने पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचला.

रात्री सुमारे ८ वाजता ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना सचिन तायडेला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

दरम्यान, या लाचखोरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लाचेची मागणी आणि स्वीकारण्यामागील संपूर्ण घटनाक्रम काय आहे, याचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button