AmravatiLatest News

परभणीच्या घटनेचे सर्वत्र पडसाद,भीम संघटनेनं केला निषेध

गेल्या दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करून विटंबना करण्यात आली यावरून परभणी मध्ये संपूर्ण आंबेडकरी संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्या या पकरणाचा निषेध भीम ब्रिगेड संघटनेनं केलाय गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने विटंबना करणाऱ्या समाजकंटकाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला व या समाजकंटकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आलीय.

गुरुवार 12 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने परभणीमध्ये विटंबना करणाऱ्या समाजकंटकाचा पुतळा जाळून निषेध केला या समाजकंटकाला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने करण्यात आलीय मागणी पूर्ण न झाल्यास जिल्ह्याभरामध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा भीम ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजेश वानखडे यांनी दिला. जसे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होत आहे त्यामुळे संपूर्ण गावागावांमध्ये निषेध मोर्चे काढण्यात येत आहे आता परभणी मध्ये झालेल्या प्रकरणावर सुद्धा असेच मोर्चे निघतील अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button