AkolacitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अकोल्यात अवैध जुगार आणि मटका व्यवसायाविरोधात ऑपरेशन प्रहार; 26 जण ताब्यात

दोन ठिकाणी पोलिसांचे छापे; 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

अकोला शहरात अवैध जुगार आणि मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी जोरदार धडक कारवाई केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत शहरातील दोन ठिकाणी छापे टाकत तब्बल 26 जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचं साहित्य आणि मटका पर्च्यांसह जवळपास 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे अवैध जुगार आणि मटका व्यावसायिकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

अकोला शहरात अवैध जुगार आणि मटका व्यवसायाला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने ऑपरेशन प्रहार अंतर्गत मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईतील पहिला छापा सोनटक्के प्लॉट परिसरातील ऐस बादशाह जुगार अड्ड्यावर टाकण्यात आला. पोलिसांनी अचानक धाड टाकत जुगार खेळणाऱ्या तब्बल 23 जणांना ताब्यात घेतलं.

यानंतर पोलिसांनी अकोटफाइल परिसरातील अन्नाभाऊ साठे चौक येथे सुरू असलेल्या वर्ली मटका अड्ड्यावरही कारवाई केली. या ठिकाणी छापा टाकत आणखी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.

दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांच्या हाती मोठ्या प्रमाणात मुद्देमाल लागला आहे. रोख रक्कम, मोबाईल फोन, जुगाराचं साहित्य आणि मटका पर्च्या असा एकूण जवळपास 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अवैध जुगार आणि मटका व्यवसायाच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक आणि सामाजिक वातावरणावर होणारे परिणाम लक्षात घेता पोलिसांनी या व्यवसायांविरोधात कठोर कारवाईचा पवित्रा घेतला आहे.

या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या संबंधित आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अकोला शहरातील अवैध जुगार आणि मटका अड्डे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. मात्र, केवळ छापे आणि कारवाईपुरताच हा धडाका मर्यादित राहणार का, की अवैध धंद्यांविरोधात सातत्याने कारवाई सुरू राहणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

ऑपरेशन प्रहार अंतर्गत पोलिसांकडून अशाच प्रकारे पुढील काळातही कारवाया केल्या जातात का आणि शहरातील अवैध जुगार-मटका व्यवसायाला कितपत आळा बसतो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अकोल्यातील दोन ठिकाणी झालेल्या या धडक कारवाईत 26 जणांना ताब्यात घेत तब्बल 2 लाख 92 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे अवैध जुगार आणि मटका व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईची तीव्रता वाढवल्याचं स्पष्ट होत आहे. आता ऑपरेशन प्रहारची ही मोहीम पुढेही अशीच सातत्याने सुरू राहणार का, याकडे अकोला शहरातील नागरिकांचं लक्ष लागलं आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button