AMCActionAmravatiAmravatiMahanagarpalikaAmravatiMunicipalCorporationcitynewsLatest NewsMaharashtra

अमरावतीकरांसाठी मोठी संधी! थकीत मालमत्ता करावरील १०० टक्के शास्तीमाफी

३१ ऑगस्टपर्यंत चालू वर्षाचा कर आणि थकबाकी एकरकमी भरल्यास मिळणार पूर्ण शास्तीमाफी; त्यानंतर टप्प्यानुसार सवलत कमी होणार

अमरावती | प्रतिनिधी

अमरावतीकरांसाठी थकीत मालमत्ता कर भरण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. अमरावती महानगरपालिकेने थकीत मालमत्ता करावरील शास्तीमध्ये टप्प्यानुसार सवलत जाहीर केली असून, पहिल्या टप्प्यात तब्बल १०० टक्के शास्तीमाफी देण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी या विशेष योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले यांनी केले आहे.

३१ ऑगस्टपर्यंत १०० टक्के शास्तीमाफी

महानगरपालिकेच्या विशेष योजनेनुसार १५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत चालू वर्षाचा मालमत्ता कर आणि मागील थकबाकी एकरकमी भरल्यास थकीत करावरील शास्तीमध्ये १०० टक्के सूट मिळणार आहे.

यानंतर सवलतीचे प्रमाण टप्प्याटप्प्याने कमी होणार आहे. १ ते १५ सप्टेंबरदरम्यान ७५ टक्के, १६ ते ३० सप्टेंबरदरम्यान ५० टक्के आणि १ ते १५ ऑक्टोबरदरम्यान २५ टक्के शास्तीमाफी देण्यात येणार आहे.

विविध सुविधांसाठीही सवलती

मालमत्ता कर भरणाऱ्यांसाठी महापालिकेने इतरही काही सवलती जाहीर केल्या आहेत. रेन वॉटर हार्वेस्टिंग, कंपोस्ट निर्मिती आणि सोलर वॉटर सुविधा असलेल्या मालमत्तांसह महिला मालमत्ताधारक, दिव्यांग आणि माजी सैनिकांसाठीही विविध सवलतींची तरतूद करण्यात आली आहे.

ऑनलाइन कर भरणाऱ्यांना अतिरिक्त सूट

ऑनलाइन पद्धतीने मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांना सामान्य करामध्ये अतिरिक्त ३ टक्के सूट मिळणार आहे. तसेच चालू वर्षाच्या सामान्य करावर १५ सप्टेंबरपर्यंत ७ टक्के सूट उपलब्ध असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पाचही झोनमधील नागरिकांना लाभ

अमरावती महानगरपालिकेच्या पाचही झोनमधील मालमत्ताधारकांना या विशेष योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट न पाहता थकीत मालमत्ता कर लवकरात लवकर भरून जास्तीत जास्त शास्तीमाफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अमरावतीकरांनो, थकीत मालमत्ता कर असेल तर ही संधी गमावू नका. ३१ ऑगस्टपर्यंत एकरकमी कर भरून १०० टक्के शास्तीमाफीचा लाभ घ्या. अधिक माहितीसाठी संबंधित झोन कार्यालयाशी संपर्क साधावा, असे महापालिका प्रशासनाने आवाहन केले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button