citynewsLatest NewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात ८ वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप; कराटे कोचला अटक

नागपूरमधून एक अत्यंत संतापजनक आणि संताप आणणारी बातमी समोर येत आहे. ज्या हातांनी चिमुरडीला संरक्षणाचे धडे घ्यायचे होते, त्याच हातांनी तिचा विश्वासघात केलाय. नागपुरात एका ८ वर्षांच्या चिमुरडीवर तिच्याच कराटे कोचने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पण या प्रकरणात नागपूर पोलिसांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे.


दिनांक १४ ऑगस्ट. नागपूर पोलिसांच्या ११२ हेल्पलाईनवर एक आपत्कालीन कॉल येतो. एका आठ वर्षांच्या चिमुरडीसोबत कराटे क्लासमध्ये गैरकृत्य झाल्याची माहिती मिळताच महिला पोलीस अधिकारी स्वतः घटनास्थळाकडे रवाना होतात.


तपासात समोर आलेली माहिती हादरवून टाकणारी होती. नंदनवन भागातील रमणा मारुती नगर येथे राहणारा ३२ वर्षांचा कराटे कोच सागर प्रभाकर दुधे, या नराधमाने क्लास संपल्यानंतर ८ वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केला. एवढेच नाही, तर ही गोष्ट कोणालाही न सांगण्यासाठी तिच्यावर दबाव टाकला आणि तिला प्रचंड घाबरवले.


मात्र, चिमुरडीने घरी पोहोचताच रडत रडत आपल्या आई-वडिलांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. आई-वडिलांनी न घाबरता तात्काळ नागपूर पोलिसांशी संपर्क साधला. माहिती मिळताच महिला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता आरोपीचे लोकेशन ट्रेस केले आणि सागर दुधे याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याने याआधीही इतर कोणत्याही मुलांसोबत असा प्रकार केला आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.


या संपूर्ण घटनेनंतर महिला पोलीस अधिकाऱ्यांनी सर्व पालकांना एक अत्यंत महत्त्वाचा संदेश दिला आहे.
पोलिसांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाल्यांशी दररोज संवाद साधा. त्यांना लहानपणापासूनच ‘गुड टच आणि बॅड टच’ यातील फरक समजावून सांगा, त्यांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करा. मुलांनी काहीही सांगितले तर त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि अशी कोणतीही घटना घडल्यास न घाबरता तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधा. कारण, आपण सर्व एकत्र आलो तरच अशा विकृतीला आणि गुन्हेगारीला समूळ नष्ट करू शकतो.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button