AmravatiamravaticitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraMaharashtraCrime

अमरावतीत पुन्हा खुनाचा थरार; शुक्रवार बाजारात ५० वर्षीय देवेंद्र ठाकरे यांची धारदार शस्त्राने हत्या

पोलीस मुख्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर घटना; आरोपी फरार, फ्रीजरपुरा पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहरातील शुक्रवार बाजार परिसरात पुन्हा एकदा खुनाची धक्कादायक घटना समोर आली आहे. फ्रीजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी पहाटेच्या सुमारास ५० वर्षीय देवेंद्र ठाकरे यांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पहाटे दोनच्या सुमारास थरार

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार बाजार परिसरात रात्री सुमारे २ वाजता देवेंद्र ठाकरे यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला.

देवेंद्र ठाकरे हे एकतानगर, बिच्छू टेकडी परिसरातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.

आरोपी फरार; पोलिसांचा शोध सुरू

घटनेची माहिती मिळताच फ्रीजरपुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून तपासाला सुरुवात केली असून, हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. हत्येचे कारण, आरोपीची ओळख आणि घटनेमागील पार्श्वभूमी तपासातून स्पष्ट होणार आहे.

दोन महिन्यांत दुसरी हत्या?

विशेष म्हणजे, शुक्रवार बाजार परिसरात सुमारे दोन महिन्यांपूर्वीही हत्येची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा याच परिसरात हत्या झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

विशेष म्हणजे पोलीस मुख्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर ही घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

शुक्रवार बाजार परिसरात वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून आता कोणती ठोस पावले उचलली जातात, तसेच देवेंद्र ठाकरे यांच्या हत्येतील आरोपी कधी पोलिसांच्या हाती लागतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button