‘हा लोकशाहीचा विजय आहे’; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया

‘रस्त्यावरून मिळालेला थेट लोकशाहीचा विजय, आता उत्तरदायित्वानंतर सुधारणांची वेळ’ – CJP, Gen Z आणि नागरिकांचे अभिनंदन
नवी दिल्ली | प्रतिनिधी
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर प्रतिक्रिया देत याला “लोकशाहीचा विजय” असे संबोधले आहे.
सोनम वांगचुक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हा लोकशाहीचा विजय आहे… थेट रस्त्यावरून मिळालेला लोकशाहीचा विजय. हा शांतता, संयम आणि चिकाटीचा विजय आहे.”
त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या CJP, देशातील Gen Z आणि देशभरातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या नागरिकांचे अभिनंदन करत, “भीतीवर मात करून देशाच्या कानाकोपऱ्यातून नागरिक रस्त्यावर उतरले, त्याबद्दल सर्वांचे आभार,” असेही नमूद केले.
वांगचुक यांनी आपल्या पोस्टच्या शेवटी, “आता उत्तरदायित्वानंतर सुधारणांची वेळ आली आहे,” असे म्हणत शिक्षण व्यवस्थेत व्यापक सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली.
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत असून, आंदोलनकर्ते आता केवळ राजीनाम्यावर न थांबता शिक्षण व्यवस्थेतील सुधारणा आणि इतर प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेवर भर देत आहेत.



