citynewsLatest NewsMaharashtra

व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे मुंबईत भव्य स्वागत; शिष्टमंडळासह अधिकृत दौऱ्याला सुरुवात

मुंबई | प्रतिनिधी
व्हिएतनामचे राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे आज सकाळी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर शिष्टमंडळासह आगमन झाले. सकाळी सुमारे 10.30 वाजता त्यांच्या विमानाचे मुंबईत आगमन होताच राज्य शासनाच्या वतीने त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पगुच्छ देऊन राष्ट्राध्यक्ष तो लाम यांचे स्वागत केले.

या स्वागत समारंभाला मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, व्हिएतनामचे वरिष्ठ अधिकारी तसेच विविध मान्यवर उपस्थित होते.

NSE ला भेट देण्यासाठी प्रयाण

विमानतळावरील स्वागतानंतर राष्ट्राध्यक्ष तो लाम यांनी आपल्या शिष्टमंडळासह मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) कडे प्रयाण केले.

भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील आर्थिक, व्यापार आणि गुंतवणूक संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने या दौऱ्याकडे महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

राष्ट्राध्यक्ष तो लाम यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक आणि आर्थिक सहकार्याला नवी चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button