“आसाममध्ये बाहेरचे लोक आणले, कारण पराभवाची भीती होती!” — ममता बॅनर्जींचा BJP वर घणाघात

उत्तर २४ परगणा, पश्चिम बंगाल (१० एप्रिल २०२६) :
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षावर (BJP) जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.
टेंटुलिया येथे आयोजित निवडणूक सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी दावा केला की, आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये BJP ला स्थानिक मतदारांवर विश्वास नव्हता, त्यामुळेच त्यांनी बाहेरील लोकांना आणून निवडणूक प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.
याचबरोबर, BJP पश्चिम बंगालमध्येही हाच डाव खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. “पश्चिम बंगालमध्ये बाहेरचे लोक आणण्याचा प्रयत्न सुरू आहे, त्यामुळेच अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत,” असा गंभीर आरोप त्यांनी केला.
ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारवर टीका करत म्हटलं की, देशातील कोणतीही यंत्रणा आता निष्पक्ष राहिलेली नाही.
“BJP ने सर्व यंत्रणा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत,” असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
या वक्तव्यामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.



