“धारणीतील भीषण आग; नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!”

धारणी (१० एप्रिल २०२६) :
धारणी शहरात दुपारी अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली. प्रभाग क्रमांक ११ मधील विज वितरण कार्यालयाच्या मागील वस्तीत एका घराला लागलेल्या आगीने काही काळ परिसरात भीतीचं वातावरण निर्माण केलं.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास ही आग लागली. आगीची तीव्रता वाढत असताना परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली. मात्र स्थानिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतकार्य सुरू केलं.
दरम्यान, नगरपंचायत अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले. नागरिक आणि अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांमुळे आग लवकरच आटोक्यात आणण्यात यश आलं.
या घटनेत जळत असलेलं साहित्य नुकसानग्रस्त झालं असलं तरी शेजारील दोन घरे वाचवण्यात यश मिळालं, ही दिलासादायक बाब ठरली. विशेष म्हणजे, या आगीत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची घटना घडलेली नाही.
सध्या आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून प्रशासनाकडून अधिक तपास सुरू आहे.
⚠️ मोठा दिलासा :
थोडासा उशीर झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता…
पण नागरिकांची सतर्कता आणि अग्निशमन दलाची तत्परता यामुळे मोठं संकट टळलं.



