“शिवनीबांधमध्ये वाघाचा धुमाकूळ! गोठ्यात घुसून शेळ्यांवर हल्ला; गावकरी दहशतीत”

भंडारा | सिटी न्यूज ग्राउंड रिपोर्ट
भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील शिवनीबांध गावात वाघाच्या वारंवार शिरकावामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. गावात वाघाचा धुमाकूळ सुरूच असून, नागरिकांच्या जीवाला थेट धोका निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री इंजवार मोहल्ला परिसरात वाघाने एका पशुपालकाच्या गोठ्यात घुसून हल्ला केला. या हल्ल्यात एक शेळी जागीच ठार झाली, तर दुसरी शेळी गंभीर जखमी झाली आहे.
🐅 वाढती दहशत:
ही पहिली घटना नसून, यापूर्वीही वाघाने गावात शिरून कोंबड्यांवर हल्ले केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे गावकरी सतत भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.
😨 गावकऱ्यांची अवस्था:
👉 गावकरी रात्रभर जागून पहारा देत आहेत
👉 महिलां आणि लहान मुलांना बाहेर पडताना भीती वाटते
👉 संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण
दरम्यान, संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, वेळेत उपाययोजना न झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते.
⚠️ गंभीर प्रश्न:
हा प्रश्न केवळ जनावरांपुरता मर्यादित नाही…
👉 तर थेट मानवी जीवित सुरक्षेशी संबंधित आहे!
शिवनीबांधमधील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून वन विभागाने तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे.
वाघाचा बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देणे ही आता प्रशासनाची सर्वात मोठी जबाबदारी ठरली आहे.
📺 अशाच थरारक आणि ग्राउंड रिपोर्टसाठी पाहत राहा – सिटी न्यूज



