City CrimecitynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात वाहनचोरीचा सुळसुळाट; CCTV मध्ये चोरटे कैद

नागपूर शहरात पुन्हा एकदा वाहनचोरीच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी थेट रस्त्यावरून दुचाकी वाहने चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे… विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे…


नागपूर शहरातील नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या केडीके कॉलेजजवळील व्यंकटेश नगर परिसरात चोरट्यांनी पुन्हा एकदा आपला डाव साधला आहे…

काल मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल तीन दुचाकी वाहने चोरी करून नेल्याची घटना घडली आहे… ही संपूर्ण घटना परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाली असून, त्यामध्ये चोरटे अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने वाहने चोरताना स्पष्ट दिसत आहेत…

या परिसरात याआधीही सायकल आणि दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत… त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे…

वारंवार होत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांनी पोलिस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे… स्थानिकांच्या मते, रात्रीच्या वेळी पोलिसांची गस्त अपुरी असून त्यामुळेच चोरट्यांना मोकळे रान मिळत आहे…

नागरिकांनी परिसरात अधिक CCTV कॅमेरे बसवण्याची आणि कडक सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणी केली आहे…

दरम्यान, या प्रकरणी नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल करून CCTV फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू केला आहे…


नागपूरसारख्या मोठ्या शहरात अशा प्रकारे वाढत चाललेल्या चोरीच्या घटना नागरिकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहेत… प्रशासन यावर किती प्रभावी कारवाई करते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button