नागपुरात ‘दर्पण’ बारमध्ये धाडसी चोरी; शटर फोडून रोख रक्कम व विदेशी दारू लंपास

नागपूर शहरातील कोराडी परिसरात धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. ‘दर्पण’ बार अँड रेस्टॉरंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी शटर फोडून प्रवेश करत रोख रक्कम आणि महागडी विदेशी दारू लंपास केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ मार्चच्या रात्री साडेअकराच्या सुमारास बारचे कर्मचारी नेहमीप्रमाणे बार बंद करून घरी गेले होते. त्यानंतर संधी साधत चोरट्यांनी शटर तोडून आत प्रवेश केला.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांच्या हालचाली स्पष्ट दिसत असून, त्यांनी अत्यंत नियोजनबद्ध आणि सराईत पद्धतीने ही चोरी केल्याचे समोर येत आहे. काउंटरमधील रोख रक्कम तसेच महागड्या विदेशी दारूच्या बाटल्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला.
या घटनेमुळे बार मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी व्यवस्थापक दिनेश सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पोलीसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, कोराडी आणि शिवाजीनगर परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांनी गस्त वाढवावी आणि चोरट्यांना लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे.
कोराडीतील ‘दर्पण’ बार चोरी प्रकरणात पोलिस तपास वेगाने सुरू असला तरी, शहरात वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
या प्रकरणातील आरोपींना लवकरच अटक होते का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



