citynewsCrime NewsLatest NewsMaharashtraNagpurNagpur gramin

नागपुरात घरफोडी प्रकरणाचा उलगडा; दोन आरोपी अटकेत, ९० हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर शहरात घरफोडी करणाऱ्या दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या चोरीप्रकरणाचा पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत पर्दाफाश करत आरोपींकडून मोबाईल, मोटरसायकलसह सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शोभना राय या गांधी नगर परिसरात वास्तव्यास आहेत. त्या २२ फेब्रुवारी रोजी आपल्या कुटुंबासह बाहेरगावी गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत २८ फेब्रुवारी रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून चोरी केली. या चोरीमध्ये वायरलेस इअरफोन, सोन्याची नथ, सुमारे १० हजार ५०० रुपये रोख रक्कम, काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच इतर साहित्य असा ऐवज चोरून नेण्यात आला.

या प्रकरणी अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. बळभी ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तांत्रिक पुरावे आणि गोपनीय सूत्रांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी वैभव संजय वानरे (वय १९) आणि रोहित चंद्रभान बानेवार (वय १९) या दोन आरोपींना अटक केली. आरोपींकडून मोबाईल फोन, स्मार्टवॉच, ग्लो ड्रायर, तांब्याच्या तारा, हिरो कंपनीची मोटरसायकल तसेच अॅपल कंपनीचा मोबाईल असा सुमारे ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

तपासादरम्यान या आरोपींकडून आणखी दोन गुन्हे उघडकीस आले असून त्यामध्ये मोटरसायकल चोरी आणि एसी युनिटमधील कॉपर वायर चोरीचा समावेश आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button