India NewsLatest NewsMaharashtraNandedpolitics

हणमंत पवार यांच्यावर हल्ल्याचा निषेध

नांदेड प्रतिनिधी :
नांदेड शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विविध घटनांच्या निषेधार्थ काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संताप व्यक्त केला.

हरियाणा राज्यातील सिक्री येथील एका रिसॉर्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि राणी पद्मावती यांच्या प्रतिमा स्वच्छतागृहाच्या प्रवेशद्वाराजवळ लावल्याचा प्रकार उघड झाल्याचा आरोप करण्यात आला. या घटनेचा काँग्रेसने तीव्र निषेध नोंदवून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली.

तसेच काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हणमंत पवार यांच्यावर पुण्यात झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ आणि भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष उदय भानू चिब यांच्या अटकेच्या निषेधार्थही आंदोलन करण्यात आले.

या निदर्शनात प्रदेश सरचिटणीस सुरेंद्र घोडजकर, जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, जिल्हा कार्याध्यक्ष महेश देशमुख, नगरसेवक सत्यपाल सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संबंधित घटनांबाबत कठोर कारवाईची मागणी केली असून लोकशाही मार्गाने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button