AmravatiEducation NewsLatest News

विद्यापीठाची हिवाळी-2025 लेखी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, विद्याथ्र्यांनी नोंद घेण्याचे विद्यापीठाचे आवाहन

अमरावती (दि.18.02.2026)- संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची हिवाळी – 2025 च्या लेखी परीक्षेतील पर्यायी परीक्षेचे वेळापत्रक/रोल लिस्ट विद्यापीठाच्या www.sgbau.ac.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहेत, त्यामधील परीक्षा केंद्र क्रमांक 212 अंतर्गत एम.ई.(सी.ई. स्ट्रक्चर इंजिनिअरिंग) सेमि.-1 (सी.जी.एस.) आयएसएफएसईआय इन्ट्रोडक्शन टू अर्थक्वेक अॅन्ड रेट्रो फिटींग ऑफ स्ट्रक्चर्स या विषयाची पर्यायी परीक्षा दि. 18 फेब्राुवारी, 2026 ऐवजी बुधवार दि. 04 मार्च, 2026 रोजी दुपारी 2.00 ते 5.00 या वेळेत यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेकरिता विद्याथ्र्यांना मूळ परीक्षेसाठी देण्यात आलेले प्रवेशपत्र कायम राहील, त्याचप्रमाणे जाहीर करण्यात आलेली रोल लिस्ट सुध्दा कायम राहील. असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून कळविण्यात आले आहे.
                यासंदर्भात सर्व प्राचार्य, केंद्राधिकारी, संबंधित महाविद्यालये, परीक्षा केंद्र यांना पत्राव्दारे परीक्षा विभागाकडून कळविण्यात आले असून, सदर बदलाची सर्व विद्याथ्र्यांना जाणीव करुन द्यावी, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. नितीन कोळी यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता विद्यापीठाच्या वेबसाईटवर परीक्षा विभागाच्या अधिका-यांच्या क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विद्यापीठाच्यावतीने कळविण्यात येत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button