Latest NewsMaharashtra Politicspolitics

‘त्या’ दबावापोटीच भाजपनं मराठी महापौर केला, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खान दिसल्याने राऊतांनी आरएसएसलाही खोचक प्रश्न विचारले आहेत. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनाही राऊतांनी यावेळी सल्ला दिलाय. ज्याला महापौरांनी तात्काळ प्रत्युत्तरही दिलंय. काय म्हणाले संजय राऊत? सविस्तर जाणून घेऊया.

सत्ता गेल्यावरही सलमान येईल का?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात सलमान खानला आमंत्रित केल्यानं राऊतांनी संघाचं कौतुक केलंय. तसंच संघात मुस्लिमांना खुलं निमंत्रण आहे का? असा खोचक सवालही उपस्थित केलाय.. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाची व्याख्यानमाला सुरु आहे..शनिवारी या व्याख्यानमालेचा शुभारंभ झाला. या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खान यालाही आमंत्रित करण्यात आलं होतं. यावरुन राऊतांनी संघाचं कौतुक केलं तसंच सत्ता गेल्यावरही सलमान संघाच्या व्यासपीठावर येईल का? असा खोचक सवालही विचारला.

महापौरांना टोला
महापौरांनी मुंबईच्या विकासावर बोलावं, असा टोला संजय राऊतांनी रितू तावडेंना लगावलाय. भाजपच्या महापौर उमेदवार रितू तावडेंनी मुंबईतील बांगलादेशी घुसखोरांना बाहेर काढणार असं वक्तव्य केलं. यावर महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. मोदी आणि निर्मला सितारामन यांना भेटून भूमिका समजून घ्यावी, असं म्हटलंय. दरम्यान बांगलादेशी घुसखोरांबद्दल तुम्हाला पुळका का?, असा सवाल भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केलाय.

‘रितू तावडे मूळच्या काँग्रेसी’
रितू तावडे मूळच्या काँग्रेसी आहेत.भाजपकडे स्वत:चं असं काही नाही, अशी टीका संजय राऊतांनी केलीय. याला नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी तात्काळ प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊतांना राजकारण करायची सवय आहे. राऊतांनी आधी स्वत:च्या घरात डोकावून बघावं, असं प्रत्युत्तर रितू तावडेंनी राऊतांना दिलंय.

पैठणला आमदार लहान मुलाला मतदानाला घेऊन गेले.’ही कसली निवडणूक? असा प्रश्न विचारत हा पोरखेळ सुरुये, असे म्हणत संजय राऊतांनी विलास भुमरेंवर निशाणा साधलाय. सोलापूरमधील मोहोळमध्ये धाब्यावर EVM आढळल्यावरही राऊतांनी टीका केलीय.

‘म्हणून मराठी महापौर..’
मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना मराठी जनतेचं भरभरून मतदान दिले. त्या दबावापोटीच भाजपनं मराठी महापौर केल्याची टीका संजय राऊतांनी केली. मुंबईतला मराठी माणूस हिंदुच भाजपला कळलं. मराठी माणसानेचं हिंदुत्वाचं रक्षण केल्याचे संजय राऊत म्हणाले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button