Accident NewsLatest NewsSangli

सांगलीत धामणी चौकातील मयूर नर्सरीला भीषण आग; महिलेचा संशयास्पद मृत्यू, पती फरार

सांगली शहरातील धामणी चौक परिसरात असलेल्या मयूर नर्सरीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली असून या आगीत होरपळून एका महिलेचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. निकिता शिव मनगुळे-लोंढे असे मृत महिलेचे नाव आहे. या आगीत नर्सरीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निकिता मनगुळे-लोंढे व तिचा पती मूळचे कर्नाटकातील कागवाड येथील रहिवासी असून सध्या ते सांगलीतील मयूर नर्सरीमध्ये पत्र्याच्या शेडमध्ये वास्तव्यास होते. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास नर्सरीतील पत्र्याच्या शेडला तसेच झाडांना अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.

मात्र अग्निशमन दल पोहोचेपर्यंत निकिता ज्या पत्र्याच्या शेडमध्ये राहत होती, त्या ठिकाणी ती होरपळल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे या शेडला बाहेरून कडी लावलेली असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच आगीच्या घटनेनंतर तिचा पती घटनास्थळावरून फरार झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

या घटनेनंतर मृत महिलेच्या पतीचा शोध घेण्यासाठी विश्रामबाग पोलीस रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करत होते. निकिता मनगुळे-लोंढे हिचा मृत्यू अपघाती आगीत झाला की तिच्या पतीने घातपात केला, याबाबत संशय व्यक्त केला जात असून या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास विश्रामबाग पोलिसांकडून सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button