Crime NewsLatest NewsNagpur

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग; कोतवाली पोलिसांकडून आरोपी अटकेत

नागपूर

नागपूर शहरात अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्याशी असभ्य वर्तन करत विनयभंग केल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही घटना कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. कळमना परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय फिर्यादी यांची १४ वर्षीय अल्पवयीन मुलगी कोतवाली हद्दीतील एका शाळेत शिक्षण घेत आहे. या मुलीचा विजय अंकुश चौधरी (वय २६), रा. आजरी–माजरी, यशोधरानगर, नागपूर हा तरुण सातत्याने पाठलाग करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

सोमवारी आरोपीने अल्पवयीन मुलीला अडवून, “तू माझ्याशी का बोलत नाहीस, तू नाही बोललीस तर मी जीव देईन,” असे धमकीवजा शब्द वापरले. त्यानंतर आरोपीने तिच्या जवळ येत असभ्य वर्तन केले. या प्रकारामुळे मुलीच्या मनात भीती आणि लज्जा निर्माण झाली असून तिचा विनयभंग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या घटनेनंतर मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक कुमठकर यांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२ तसेच पोक्सो कायदा कलम ७ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली आहे.

सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून या प्रकरणाचा पुढील तपास कोतवाली पोलीस करत आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button