Latest NewsMaharashtraSports

क्रिकेटचा महासंग्राम : पत्रकार क्रिकेट चषक 2026 चे आयोजन

८ ते १३ जानेवारीदरम्यान सोळा संघांचा सहभाग

पुसद

पुसद येथील यशवंत रंग मंदिर मैदानावर दिनांक ८ जानेवारी ते १३ जानेवारी २०२६ या कालावधीत भव्य पत्रकार क्रिकेट चषक २०२६ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात येत असून यंदा एकूण १६ संघांचा सहभाग असणार आहे.

या स्पर्धेत
एम.आर. इलेवन, सरपंच इलेवन, घरकुल अभियंता इलेवन, पोलिस इलेवन, डॉक्टर इलेवन, महावितरण इलेवन, ॲडव्होकेट इलेवन, महसूल इलेवन, एन.पी.आरोग्य, अभियंता इलेवन, फॉरेस्ट इलेवन, कृषी विभाग, जिल्हा परिषद इलेवन, पत्रकार इलेवन, आरोग्य सेवक इलेवन आणि पाटबंधारे विभाग इलेवन
असे एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत.

दिनांक ८ ते १३ जानेवारी या कालावधीत सामने रंगणार असून प्रत्येक सामना ८ षटकांचा, तर अंतिम सामना १० षटकांचा असेल. स्पर्धेचा उद्घाटन सामना मागील वर्षीचा विजेता अभियंता इलेवन आणि उपविजेता डॉक्टर्स इलेवन यांच्यात सकाळी ९ वाजता खेळवण्यात येणार आहे.

स्पर्धेचे उद्घाटन नामदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे तर मार्गदर्शक म्हणून डॉ. मोहम्मद नदीम उपस्थित राहणार आहेत. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ. मोहिनी नाईक तसेच सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्व. पै. बाबाराव लेवेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ, श्री रमेश चव्हाण पाटील यांच्यावतीने प्रथम, द्वितीय, तृतीय व चतुर्थ क्रमांक मिळवणाऱ्या संघांना आकर्षक ट्रॉफी प्रदान करण्यात येणार आहेत.

या रोमांचक क्रिकेट स्पर्धेला क्रीडाप्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पत्रकार क्रिकेट क्लब, पुसद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button